सूचना :
1) उक्त 'A' लिंकमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक 21/09/2021 अन्वये उसतोड कामकागाराची सर्व खातरजमा करण्यासाठी शासन निर्णय देण्यात आलेला आहे. त्यानुसार खातरजमा करून 'B' लिंकनुसार सर्व फिल्डव्दारे माहिती भरून घ्यावी.
2) सदरची माहिती खालील 'B' लिंकमधून कुटुंब प्रमुखाचे व तसेच कुटुंबातील व्यक्तीचे नांवे युनिकोड मराठी फॉट (Unicode Font) मध्ये नमूद करावी व इतर माहिती इंग्रजी (English) मध्ये भरावी.
3) सदरची माहिती अचूक भरावी.
4) कुटुंबातील कुटुंब प्रमुख्याच्या आधार नंबरवर एकवेळेस माहिती भरता येईल. पुन्हा त्याआधार नंबरवर पुन्हा माहिती भरता येणार नाही. यांची नोंद घ्यावी.
5) उसतोड कामगाराची नोंदणी झाली किंवा कसे याबाबत 'C'लिंक मधून खातरजमा करावी.
5) वरील 'D' लिंकमधून ग्रामपंचायत अंतर्गत उसतोड कामगाराची माहिती पाहण्यासाठी व भरलेल्या माहितीमध्ये बदल [Edit] करण्यासाठी दिलेल्या फिल्डमध्ये गावाचा कोड व संगणक चालक मोबाईल नंबर यांचा पासवर्ड म्हणून वापर करावा. गावाचा कोड हा आपण गावाची नोंदणी केली तेव्हा आपल्या ई-मेलवर पाठविण्यात आलेला आहे.
==================
=> अर्जदार मागील २-३ वर्षात...
मागील २-३ वर्षात उसतोडणीला न गेलेले मात्र त्यापूर्वी किमान ५ वर्ष ऊसतोड करण्याऱ्या मजूराचाही ऊसतोड कामगार यामध्ये समावेश करण्यात यावा..
=> अर्ज कोणी भरू शकतो?...
एक अर्ज हा एका कुटुंबासाठी असेल.
कुटुंब व्यख्या :- पती, पत्नी व त्याची अविवाहित मुले.
विवाहित मुलांचे स्वतंत्र कुटुंब समजावे.
=> वृध्द आई -वडील...
वृध्द आई -वडील उसतोडणीला जात असल्यास त्यांचेही स्वतंत्र कुटुंब ग्राह्य धरावे. मात्र वृध्द आई -वडील उसतोडणीला जात नसल्यास त्यांची माहिती उसतोडणीला जाणाऱ्या मुलाच्या कुटूंबात घ्यावी.
=> विवाहित मुले...
विवाहित मुले यांचे स्वतंत्र कुटुंब ग्राह्य असल्याने त्यांचा मागील ३ वर्षाचा तपशील हा अविवाहित असतानाचा ग्राह्य धरावा.
=> कुटुंबातील सदस्य...
कुटुंबातील जे सदस्य ऊस तोड मजूर म्हणून नोंदणी करणार असतील तर त्यांची जन्म दिनांक,आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, रक्त गट, पासपोर्ट फोटो आवश्यक आहे त्याच बरोबर त्या सदस्याची बँक तपशील आवश्यक आहे.
=> या फॉर्म सोबत...
या फॉर्म सोबत खालील झेरॉक्स प्रती जोडव्यात. जे ऊसतोड मजूर आहेत त्याचे 1) बँक खाते पासबुक. 2) आधार कार्ड. 3) रेशन कार्ड झेरॉक्स 4) मागील वर्षी ज्या ठिकाणी ऊस तोडण्यासाठी गेला आहात त्याठिकाणी मिळालेली पावती किंवा इतर पुरावा.